Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी मिथून भिसे

जत (सोमनिंग कोळी) : जत नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक भाजपचे शहराध्यक्ष आण्णा भिसे यांचे बंधू युवा नेते मिथून भिसे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे दाखल केला होता. आज मिथून भिसे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ.शुभांगी बनेनवर यांनी सांगितले.
भाजपचे स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांनी १७ जूनला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे स्वीकृत सदस्याच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलं होतं. आज नगर पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.जत उपविभागीय कार्यालयात भाजपकडून मिथून भिसे यांचं एकमेव अर्ज दाखल होते. गट नेते यांचे सूचनेनुसार मिथून भिसे यांचे नाव भाजपकडून निश्चित करण्यात आले असल्याचे पत्र दिले.  यानंतर भिसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ शुभांगी बनेनवर यांनी जाहिर केल. यावेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

 भिसे हे जत शहरातील तरुण नेते असून भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. विलासराव जगताप यांचे विश्वासू लाडके व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गोंधळी समाजातून ते येतात शिवाय शहरात मोठा तरुण वर्ग उत्तम संघटक त्यांच्याकडे आहे. राजकारणात कुठेही असो निष्ठेने काम करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.

Post a Comment

0 Comments