Daily Mahasatta

Daily Mahasatta

लायन्स क्लबच्या चेअरमनपदी सौ. स्मिता बजाज

सांगली (प्रतिनिधी)
विधायक आणि रचनात्मक कार्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सांगली सिटीच्या नुतन पदाधिकाऱ्याच्या पदग्रहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सन 2021-22 वर्षासाठी तरुण, सहृदय कार्यकत्या सौ. स्मिता चंद्रशेखर बजाज यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा गव्हर्नर  विजय राठी होते. त्यांच्या शुभहस्ते नुतन सदस्यांना पद व  गोपनियतेची शपथ देण्यात आली. याप्रसंगी सौ. स्मिता बजाज यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की, कोरोनारुपी भस्मासुर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच  लोकांना मोठी झळ बसत आहे. भविष्यात लहान मुलांना या रोगाचा मोठा धोका संभवतो आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व धोका टाळण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जनजागृती, मदत तसेच इतर उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केला. सन 2021-22 नुतन कार्यकारिणीत सौ. ज्योति र. सारडा, (सेक्रेटरी), अ. सौ. अर्चना  निलावर (खजिनदार), सौ. साधना  काडीया, हा. सौ. नुतन शहा, . सौ. सुखदा पु. गाडगिळ, सौ रश्मी मालाणी, सौ. श्वेता दि मुंदडा, तर आय हॉस्पिटल कमिटीसाठी हा श्रीकांत  भोकरे आदीची निवड करण्यात आली. कोविड च्या पार्श्वभूमी वर नियमांचे काटेकोर पालन करून मोजक्या प्रमुख पदाधिकारी सभासदाच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments