Daily Mahasatta

Daily Mahasatta

जगण्यासाठी हर्षालीला हवा मदतीचा हात

वाळवा (रहिम पठाण) : आयुष्य समजण्या अगोदरच काही काही वेळा जिवनाशी संघर्ष करावा लागतो, असच काही या अवघ्या नऊ वर्षीच्या हर्षालीच्या बाबतीमध्ये घडले आहे.

नाव हर्षाली अमोल माने गाव मसुचीवाडी ता.वाळवा. हीच्या वरती सांगली येथे उपचार सुरु होते पण तिच्या  दोन्हीही किडण्याचे प्रत्यारोपन करण्याची  आवश्यकता आहे असे डाॕक्टरांनी सांगितले. त्यासाठी  पुढील उपचार मुंबई येथे करणे गरजेचे आहे असा सल्ला  तिचे वडील अमोल माने याना डाॕक्टरांनी दिला. ते तीला मुंबईला घेऊन गेले आहेत. सर्व तपासणी केल्यानंतर  हर्षालीच्या उपचारासाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च  येऊ शकतो असे तेथे त्यांना सांगितले आहेत. परंतु अमोल माने यांची घरची परीस्थिती ही जेमतेमच आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळे काही सल्ले ही देण्यात आले पण बाप हा शेवटी बापच असतो आपल्या चिमुकल्या फुलपाखरासाठी वाठ्ठेल ते करण्याची तयारी ठेऊन ते परिस्थिशी झगडत आहेत.अशा वेळी आपण सर्वानी सामाजिक बांधिलकी म्हणून हर्षालीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मदत करावी असे आव्हान केले आहे.

अमोल माने यांचा मो.नंबर 7020513567 आपण सर्वानी थोडा जरी हातभार लावला तरी या बापाच्या प्रयत्नाना यश येऊ शकते.

Post a Comment

0 Comments