Daily Mahasatta

Daily Mahasatta

पाच वर्षाच्या नाती वर बलात्कार

नराधमाला २० वर्षाची शिक्षा

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : पाच वर्षे वयाच्या स्वतःच्या नातीवर बलात्कार करणाऱ्या नामदेव विठोबा जाधव (वय-५८ वर्षे) रा.मंठा, जि. जालना याला येथील जिल्हा-सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ नुसार १ वर्ष सश्रम कारावास व १५०० रु.दंड व दंड न भरलेस दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या केसची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. एम. चंदगडे यांच्या समोर झाली.
       
ही घटना  ०१/१२/२०१८ रोजी घडली होती. पिडीत अल्पवयीन मुलगी  एकटीच खोपीमध्ये असलेचा फायदा घेवून नामदेव जाधव याने तिचेवर बलात्कार केला होता.  पिडीत अल्पवयीन मुलगीचा नात्याने आजोबा असून त्याने  तिचेवर बलात्कार केला होता. त्यामुळे भा.द.वि. कलम ३७६ (अ.ब) ३७६ (२), (एफ) व बाललैगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ६, ८, १२ प्रमाणे त्याच्यावर  शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर  केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासणेत आले. त्यापैकी फिर्यादी वडील, पिडीत मुलगी, पिडीत मुलीची आई, पंच, मेडीकल ऑफिसर व तपासी अंमलदार यांची साक्षी महत्वाच्या ठरल्या.
      
सरकारी वकील म्हणून सौ. शुभांगी व्ही. पाटील यांनी काम पाहिले. सदर आरोपीने आरोपी आणि पिडीत मुलगी ही आजोबा-नात असे नाते असतानाही त्याने नात्याला काळीमा फासलेला आहे. अशा समाजविघातक कृत्यामुळे कुटूंब व्यवस्थेवर विपरित परिणाम होईल व एकत्र कुटूंब व्यवस्था धोक्यात येवून एकूण समाज प्रणालीला हे घातक ठरेल. म्हणून अशा कृत्यांचा धाक समाजामध्ये राहणेसाठी जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा जोरदार युक्तीवाद केला. सदर कामी आलेल्या पुराव्याआधारे न्यायालयाने  २० वर्षे सश्रम कारावास व बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ नुसार १ वर्षे सश्रम कारावास व १५००/- रुपये दंड व दंड न भरलेस दीड महिना साध्या करावासाची शिक्षा ठोठावली.

Post a Comment

0 Comments