Daily Mahasatta

Daily Mahasatta

सर्वाधिक कर भरल्याबद्दल समृद्धी इंडस्ट्रीजचा गौरव


सांगली
(प्रतिनिधी)
माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कर चुकवेगिरीचे प्रकार उघड होत आहेत. वेळोवेळी कार्यावाही करुन कर वसुली मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, असे केंद्रीय जीएसटीचे सहायक आयुक्त के राजकुमार यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात समाधानकारक कर वसुली झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय वस्तु व सेवाकर विभागाच्या कार्यालयात 'जीएसटी' चा चौथा वर्धापन साधेपणाने साजरा झाला. अर्थतज्ञ प्रा. संजय ठिगळे यांचे भाषण झाले. सर्वाधिक कर भरल्याबद्दल समृद्धी इंडस्ट्रीज ला गौरवण्यात आले. कंपनीचे डायरेक्टर श्री. रमाकांत मालू, श्री ओमप्रकाश मालू व श्री. प्रमोद मालू  यांचे मार्गदर्शन कंपनीस लाभले. त्यांच्यावतीने अकौंट मॅनेजर शरद पाटील तसेच कंपनी सेक्रेटरी नितिन कारंडे यांचा प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला.  सी. ए. महेश ठाणेदार यांनी मनोगत व्यक्त केले. निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी सूत्रसंचालन केले.

अधीक्षक आर. एच. कुलकर्णी प्रमोद कुशवाह, पंकज बंसल, मुख्य हवालदार यासीन मुलाणी यांचे भाषण झाले. प्रास्तविक अधीक्षक निवेन तेलंग यांनी केले. आभार अधीक्षक मकरंद कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments