Daily Mahasatta

Daily Mahasatta

न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड चे बी. डी. एस. परीक्षेत घवघवीत यश


कुपवाड (प्रमोद अथनिकर)
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी  ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (B.D.S) परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.
     नुकत्याच पार पडलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (B.D.S) या परीक्षेत न्यू प्रायमरी स्कुल चे विध्यार्थी प्रसाद धोतरे याने 100 पैकी 100 गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले. ओम बिरादार इ. 1 ली, आदित्य भोसले, वैभवी बने इ. 3 री, अथर्व सायमोते इ. 4 थी, जय बिरादार इ.6 वी यांनी गोल्ड मेडल, तर कृष्णा मासाळ इ. 1ली, वेदांत कुलकर्णी, रितेश पुजारी, सोहम कोष्टी इ. 2 री, समर्थ मोहिते इ. 3 री यांनी सिल्वर मेडल, तसेच धनश्री पवार इ. 2 री, हर्षा कडी, अदिती चिनमुरे इ. 3 री, प्रिती सुर्वे इ. 4 थी, तृप्ती सायमोते  इ. 6 वी, प्राची जाधव इ. ७ वी यांनी ब्रांझ मेडल पटकाविले आहे.
       सदर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रमुख अमोल राठोड, प्रतिभा पाटील, हेमलता धोतरे, वंदना हाके, आसावरी आरते, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले तर मुख्याध्यापक कुंदन जमदाडे, पर्यवेक्षक अनिल शिंदे यांचेकडून प्रोत्साहन तर संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, संचालक सूरज उपाध्ये, संचालिका  कांचन उपाध्ये, डॉ. पूनम उपाध्ये यांचेकडून बहुमोल प्रेरणा मिळाली. या उत्तुंग यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कुपवाड व परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments