Daily Mahasatta

Daily Mahasatta

येळवीत तरुणाची आत्महत्या


जत, (सोमनिंग कोळी)
 जत तालुक्यातील  येळवी येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंदू भीमराव मदने (वय. 35 )असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही घटना शनिवारी दुपारी  दोन वाजण्याच्या पूर्वी घडली आहे . या तरुणाने मोबाईलच्या स्टेटस वरती काही मजकूर लिहून आत्महत्या केल्याची चर्चा या भागात सुरू होती.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंदू मदने हा शनिवारी गावात जाऊन आला होता. दुपारी राहत्या घरी आतून कडी लावून गळफास घेतला होता. ही घटना  घरातील व्यक्तींच्या निदर्शनास आली .याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी जत पोलिसांना दिली .पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. अधिक तपास पोलीस  फौजदार रुपनर करत आहे.

Post a Comment

0 Comments