Daily Mahasatta

Daily Mahasatta

निकिताच्या यशाने ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणास चालना : रेखाताई पाटील

आष्टा (प्रतिनिधी)
शिगाव सारख्या ग्रामीण भागातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील निकिता सारखी एक मुलगी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असेल तर ही एक कौतुकास्पद बाब आहे.  निकिताच्या या यशाने ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणास चालना मिळेल असे गौरवोद्गार पोखर्णीच्या सरपंच रेखाताई पाटील यांनी काढले.

कु. निकिता प्रदीप पाटील रा. शिगाव हिची  जॉर्ज मोसन युनिव्हर्सिटी फेअरफेक्स  यु.एस.ए. येथे एम.एस. म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स  शिक्षणासाठी  निवड झालेबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होत्या. यावेळी पाटील कुटुंबियांच्या वतीने निकिता हिस पुढील शिक्षण व परदेशी वारीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिल्याबद्दल पाटील दाम्पत्याचे कौतुक केले. निकिताचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा शिगाव व दहावीपर्यंतचे शिक्षण नवोदय महाविद्यालय पलूस येथे झाले. तिने चौथी व सातवीत स्कॉलरशिप मिळवली. वालचंद महाविद्यालय सांगली येथून बी.टेकचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या यशामुळे तिची पुढील शिक्षणासाठी यु.एस.ए. येथे निवड झाली आहे.
  याप्रसंगी अशोका  ऍग्रो चे संस्थापक डॉ. सतीश पाटील पापा,  सर्वोदय  कारखान्याचे मा संचालक  नंदकुमार पाटील  आणि निकिता चे आईवडील सौ. सुवर्णा पाटील आणि प्रदीप पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments