Daily Mahasatta

Daily Mahasatta

सरपंच परिषद आंदोलनाच्या पवित्र्यात : विजय महाडिक

मांगले /राजेंद्र दिवाण
अखिल भारतीय सरपंच परिषद शिराळा तालुका यांचेवतीने स्ट्रीट लाईट विज पुरवठा खंडीत होवु नये असे निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली, यासंदर्भात, शिराळा तालुक्याचे विद्यमान आमदार, मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना निवेदन दिले,

मपंचायतचे पाणीपुरवठा व पथदिवे विजबिल थकित आसल्याने विजवितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे.यामुळे पिण्याच्या पाण्याचा व गावातील विज खंडीत झालेमुळे सरपंच याना गावामध्ये मानहानीला सामोरे जावे लागत आहे.विजवितरण कंपनीने आडमुठेपणाची भुमिका घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे अखिल भारतीय सरपंच परिषदेने या निवेदनाद्वारे केले आहे.१५ व्या वित्त आयोगातुन विजबिल थकित भरावे असे आदेश काढला असलातरी याची तरतुद आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे विज बिल भरता येणार नाही.ग्रामपंचायत क्षेञात असणारे विद्युत खांब यावरती ग्रामपंचायत कर आकारणीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली आहे. विद्युत खांब यावरती कर आकारणी केल्यास विद्युत वितरण कंपनीनेच ग्रामपंचायतीस देणे लागेल.आतापर्यंत शासन विज बिल भरत होते .कोवीडमुळे ग्रामपंचायत वसुल कमी होतआहे त्यामुळे विजबिल भरता येणार नाही अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हा उपाध्यक्ष, विजय महाडिक सरपंच भटवाडी, अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हा तालुका अध्यक्ष, मारुती भोसले सरपंच, शिरशी, राजेंद्र नाईक सरपंच चिखली , पांडुरंग कुसळी सरपंच कुसळेवाडी, विजय पाटील सरपंच काळुंद्रे, नवनाथ कुंभार सरपंच कांदे , विश्वास पाटील उपसरपंच कांदे , शिवाजी खोत उपसरपंच अस्वल वाडी, रामचंद्र पाटील उपसरपंच वाडीभागाई ,धनाजी नरोटे उपसरपंच मांगले ,राकेश सुतार सरपंच किनरे वाडी , विनोद पन्हाळकर सरपंच कुसाईवाडी, किरण पाटील सरपंच शिराळे खुर्द, धर्मेंद्र शेवाळे सरपंच बेलदारवाडी, सचिन पाटील सरपंच करमाळे,बाजीराव पाटील उपसरपंच ,प्रकाश पावले उपसरपंच पावले वाडी, बाजीराव सपकाळ उपसरपंच , सदाशिव पवार माजी सरपंच किनरे वाडी,कृष्णा माने, उपसरपंच मानेवाडी, शशिकांत पाटील माजी सरपंच कांदे, व इतर ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments