Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यात तलाठी कार्यालयास तहसीलदारांनी ठोकले टाळे

शिराळा (विनायक गायकवाड) : येथील जुन्या तहसील कार्यालयात असणाऱ्या तलाठी कार्यालयास तहसीलदार गणेश शिंदे यांनी कुलूप घातले असून वेळकाढूपणा करून नेमणुकीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित नसणाऱ्या तलाठ्यांना नेमणुकीच्या ठिकाणी पूर्णवेळ थांबण्याचे आदेश दिले आहेत.

जुन्या तहसील कार्यालयात असणाऱ्या तलाठी कार्यालयात काही तलाठी विनाकारण येऊन बसत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे केल्या होत्या. याबाबत कडक अमलबजावणीसाठी आज सकाळी ११ वाजनेच्या सुमारास शिराळा व कापरी तलाठी कार्यालय वगळून इतर तलाठी थांबत असलेल्या तलाठी कार्यालयास कुलूप लावून ते सिल केले आहे. काही तलाठी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी पूर्णवेळ थांबत नसल्याने सदर कारवाई केली आहे. त्या त्या तलाठ्यांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी पूर्णवेळ थांबण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यात कसूर न करता नेमून दिलेली कामे तलाठ्यांनी पूर्ण करावीत असेही तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments