Daily Mahasatta

Daily Mahasatta

नियमांचा भंग, दोन मंगलकार्यालयावर धडक कारवाई

सांगली: प्रतिनिधी

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने सांगली मिरजेतील मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली. सांगलीवाडीत संयुक्त पथकाने दोन मंगल कार्यालय तर मिरजेत महापालिकेने एका कार्यालयावर उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
    
सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात 19 जुलै अखेर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात सुद्धा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे आणि चंद्रकांत आडके यांच्या मार्गदर्शनाखाली चारही सहायक आयुक्तांनी रविवारी सांगली मिरजेतील अनेक मंगल कार्यालयाची पाहणी केली. यामध्ये सांगली वाडी येथेही दोन मंगल कार्यालयात नियमापेक्षा अधिक लोक आढळून आल्याने या ठिकाणी मंगल कार्यालय चालकांना प्रत्येकी 15 हजाराचा दंड करण्यात आला. या कारवाईत सहायक आयुक्त सावता खरात, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे पंकज गोंधळे व मनपा कर्मचारी प्रमोद कांबळे विक्रम वाघोली , उत्कर्ष होवाळे व शहर पोलीस प्रशासनाने सहभाग घेतला होता. तर मिरजेत शाही दरबार हाँल येथे सोशल डिस्टींगचे उल्लंघन केल्याबद्दल 10,000/- दंडात्मक कारवाई केली. सहा. आयुक्त दिलीप घोरपडे ,  स्वच्छता निरीक्षक मेघना कांबळे व अतिक्रमण विभाग , मिरज यांच्या समवेत ही कारवाई करण्यात आली

Post a Comment

0 Comments