Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

कुपवाड (प्रमोद अथनिकर)

    कुपवाड महापालिकेच्या परिसरात वेगवेगळ्या ओपन स्पेस मध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिकेने  फॅब्रिकॅटेड टाकी ठेवले आहेत. ते पाणी भरपूर दिवसाचे असल्याने या मध्ये  डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू रोगास आमंत्रण देण्याचे काम मनपा आरोग्य खात्या मार्फत होत आहे.
      कुपवाड परिसरात शारदा हौसिंग सोसायटी मध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिकेने  फॅब्रिकॅटेड टाकी ठेवण्यात आले  आहेत. परंतु या मधील पाणी भरपूर दिवसाची साठवणूक व पावसाचे पाणी पडल्याने या कुंडा मध्ये  डेंगू चे मच्छर चे पैदास मोठ्या प्रमाण होत आहे. त्या भागात एकूण 30 ते 32 डेंगू या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत व याची कल्पना मनपा आरोग्य खात्यास असून सुद्धा या गोष्टी कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.      

        या मधील पाणी उपसण्याचे काम मनपा आरोग्य खात्यांचे असून देखील ते पाणी उपसा करून त्या भागात औषध फवारणी गरजेचे आहे परंतु ते केले जात नसल्याचा आरोप त्या भागातील नागरिकांच्या तुन होत आहे. या टाक्या तातडीने रिकाम्या करून परिसरात औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments