Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड ड्रेनेजसाठी २२७ कोटींचा प्रस्ताव

: महापौर दिग्विजय सूर्यवंशी 

सांगली (प्रतिनिधी) : कुपवाड ड्रेनेज योजनेस २२७ कोटी ५९ लाख रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने महापालिकेला सादर केला आहे.  कुपवाड बरोबर सांगली मिरजेतील काही भाग यात समाविष्ट आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.

महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुपवाड ड्रेनेज योजना जलद गतीने राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मिरज ड्रेनेज योजनेचे काम ९० टक्केहुन अधिक काम  झाले आहे, कुपवाड ड्रेनेज योजनेचा अपेक्षित खर्च २१३ कोटी रु आहे. ड्रेनेजची लांबी २७० किलोमीटर आहे. सांगली मिरजेतील काही भाग ३१ किलोमीटर लांबीचा आहे. त्याचा अंदाजित खर्च १५ कोटी रु इतका आहे. नगरोतथान योजना, जलशक्ती अभियान, अमृत योजनेतून ड्रेनेज कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेला येत्या महासभेत मान्यता घेतली जाईल. योजनेची तांत्रिक तपासणी मंडळ कार्यालयाकडून होईल. 

त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर होईल.तसेच  मल शुद्धीकरण केंद्र कुंभार मळा येथील २ एकर ३५ गुंठे जागेत होणार आहे.,त्याठिकाणी शुद्ध झालेले पाणी मिरज - कोल्हापूर रस्त्यावरील ओढ्यात सोडले जाणार आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक संतोष पाटील व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments