Daily Mahasatta

Daily Mahasatta

आत्मशक्ती पतसंस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


पेठ (रियाज मुल्ला)
तीळगंगा ओढापात्रा ला आलेल्या   महापुराने ओढापात्राच्या परिसरात असणाऱ्या घरात पाणी गेल्याने बऱ्याच कुटुंबांचे नुकसान झाले होते. पुराचा फटका बसलेल्या आशा सर्वकुटुंबाना आत्मशक्ती पतसंस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
   यावेळी डॉ. अभिजित पाटील, तलाठी के. बी.मुलाणी, संस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील,व्हा. चेअरमन अंबादास पेठकर, शेखर बोडरे,कृष्णा बॅंकेचे संचालक नामदेव कदम,अरुण कदम,ज्येष्ठ संचालक प्रदीप पाटील,रवींद्र पाटील,जयवंत जाधव,महादेव पाटील,निवास पाटील,सुमित पाटील,जनरल मॅनेजर संजय दाभोळे,सुरेश पाटील,रमेश पाटील,शिवाजी खापे, हंसराज पाटील तसेच आत्मशक्ती समूहाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments