Daily Mahasatta

Daily Mahasatta

अनिलभाऊंनी सोडवली विट्यातील मोठी समस्याविटा शहरातील नेवरी रस्ता ते मायणी रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने बाह्य मार्गाने वाहतूक वाढणार असून पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या कमी होणार आहे.
विटा (प्रतिनिधी)
विटा शहरातील नेवरी रस्ता ते मायणी रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी विटेकर नागरिकांतून करण्यात येत होती. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी हा प्रश्न निकाली काढला असून वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून या कामाचा शुक्रवार १६ रोजी नेवरी नाका येथे शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक अमर शितोळे यांनी दिली आहे.

नगरसेवक अमर शितोळे म्हणाले नेवरी रस्ता ते मायणी रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी भवानीमाळ, पाटील वस्ती परिसरातील नागरिकांनी केली होती. या रस्त्यामुळे विटा शहरात कराड रस्त्यावरून येऊन मायणी रस्त्याकडे जाणारी सर्व वाहतूक बाहेरच्या बाहेर जाऊ शकणार आहे. त्यामुळे विटा शहरातील सर्वात मोठी वाहतूक कोंडीची समस्या देखील काही प्रमाणात सुटणार आहे. या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून ४९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच मायणी रोड केमिस्ट भवन ते नांगरे पाटील घरापर्यंतच्या रस्त्याला २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

सद्यस्थितीत नेवरी रस्ता ते मायणी रस्ता या अंतर्गत रस्त्याची झालेली दुर्दशा छायाचित्रात दिसत आहे.

शुक्रवार ता. १६ रोजी सकाळी १० वाजता आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या शुभहस्ते या रस्त्याचा कामाचा शुभारंभ होणार आहे.  यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, नगरसेवक अमोल दादा बाबर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, सुखदेव शितोळे, दत्तात्रय गायकवाड, सदाशिव गायकवाड, श्रीधर जाधव, प्रवीण गायकवाड, प्रदीप शितोळे, अनिल हराळे, प्रकाश गायकवाड, सिद्धनाथ गायकवाड, माजी नगरसेवक रमेश शितोळे, सुनील मेटकरी तसेच मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगरसेवक अमर शितोळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments