Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेच्या मिरज प्रभारी उपायुक्तपदी चंद्रकांत आडके

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या मिरज विभागाच्या प्रभारी उपायुक्तपदी चंद्रकांत आडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियुक्तीबाबत आदेश काढले आहेत. 
    
चंद्रकांत आडके हे सध्या महापालिकेचे प्रभारी नगरसचिव आहेत. ते गेली ३५ वर्षे महापालिका सेवेत आहेत. या काळात त्यांनी आस्थापना अधिकारी, कर निर्धारक संकलक या विभागाचे खातेप्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मिरज उपायुक्तपद रिक्त असल्याने आणि कोरोना उपाययोजना करण्यासाठी उपायुक्त मिरज या पदावर अधिकारी नियुक्ती आवश्यक होती. त्यामुळे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी मिरज प्रभारी उपआयुक्त म्हणून चंद्रकांत आडके यांची नियुक्ती केली आहे. चंद्रकांत आडके यांनी सोमवारीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नियुक्ती नंतर महापालिका अधिकारी, पदाधिकारी , नगरसेवक तसेच कार्यालयीन स्टाफने चंद्रकांत आडके यांचे अभिनंदन केले. मिरज उपायुक्त म्हणून काम करत असताना आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी प्रश्नांना प्राधान्य देऊन नगरसेवकांच्या कामानाही प्राधान्य देऊ अशी ग्वाही नूतन प्रभारी उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी दिली.

Post a Comment

0 Comments