Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत शहरात पेव्हींग ब्लॉकचे निकृष्ट काम रिपाइंने बंद पाडले

 
 जत : शहरातून जाणाऱ्या विजापुर गुहागर महामार्ग लगत सुरू असलेले काम रिपाइंने बंद पाडले.

जत (सोमनिंग कोळी)
     विकासाला चालना मिळावी म्हणून भाजप व मित्र पक्षांनी केंद्र सरकारने जत शहरातून जाणारा राष्ट्रीय विजापूर गुहागर (१६६) या कामास मंजुरी दिली होती  . परंतु शहरातील महामार्गाच्या कामात मनमानी सुरू आहे.यात रुंदीकरण कमी करणे, निकृष्ट काम करणे, दुर्व एजन्सी गुण नियंत्रणचे काम व्यवस्थित पाहत नाही. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टीने यापूर्वी आंदोलन केले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. रिपाइंने रस्त्यावर उतरत निकृष्ट दर्जाचे पेविंग ब्लॉकचे काम बंद पाडले. तसेच संभाजी चौक ते राजे रामराव विद्यामंदिर पर्यंतचा खड्डे युक्त रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून हटके आंदोलन करण्यात आले. सदरच्या कामाची गुणवत्ता त्रयस्थ संस्थेकडून तपासण्याची मागणी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे यांनी केले आहे .
    
   या आंदोलनात रिपाईचे उपाध्यक्ष विकास साबळे, विद्यार्थी आघाडीचे सुभाष कांबळे, प्रशांत एदाळे, जिल्हा युवा आघाडीचे कार्याध्यक्ष प्रा. हेमंत चौगुले, तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे, राहुल चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण आदी नी कोरोना च्या नियमाचे पालन करत आंदोलनात सहभाग घेतला होता.
   
   दरम्यान आंदोलन सुरू असताना निकृष्ट कामाची पाहणी करण्यात आली यावेळी ब्लॉक च्या खाली माती मिश्रित खडी पसरण्यात आले असल्याचे दिसून आले. ठिक ठिकाणी कामे खचली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरना कामात वापरत असलेल्या साहित्याची माहिती व दर्जा ची माहिती व्यवस्थित देता आली नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सदरचे काम एमआयडीसी पासून एसटी स्टॅन्ड पर्यंत निकृष्ट असलेले काम कडून नव्याने गुणवत्तापूर्वक दर्जा धारक काम करण्याची मागणी केली आहे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे 
    
 कांबळे  म्हणाले , वेळोवेळी तक्रार देऊन देखील तरीदेखील कामाच्या दर्जाबाबत कोणतीही सुधारणा केली नाही .संबंधित दुर्व कंट्रक्शन कंपनीने कामाचा दर्जा तपासणे गरजेचे आहे . या कंपनीकडे अप्रशिक्षित सुपरवायझर आहेत यांना कामातील गुण प्रमाण याची माहिती नाही परिणामी सदरच्या एजन्सीचे गुण नियंत्रण करणं ची गरज निर्माण झाली आहे गुण नियंत्रण तपासण्यासाठी दिलेल्या दूरव कन्स्ट्रक्शन एजन्सीला व संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला रस्ते प्राधिकरण पाठीशी घालत आहे हा प्रकार सर्व जनतेच्या लक्षात आलेला आहे. जतच्या जनतेने हे सहन करणे कसं शक्य आहे.

   शहरातील काम पूर्णत्वास जात आहे प्रस्तावित आराखड्याप्रमाणे कोणतेही काम केलेले नाही सदरचा कामाचा दर्जा सुमार आणि निकृष्ट पद्धतीचा आहे या कामाबाबत लोकप्रतिनिधी का गप्प आहेत ? काम पूर्ण करून गाशा गुंडाळण्याचा काम संबंधित कंपनी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरात अनेक ठिकाणी अप्रोच रस्त्याची गरज असताना ते देखील रस्ते केलेले नाही या कामामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे सदरचा प्रकार न थांबल्यास रिपब्लिकन पार्टी च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे.
  
 ------------------------------------
     ड्रेनेज लागली ढासळू :
  
     पेविंग ब्लॉक खाली माती पसरून काम उरकण्याचा केविलवाणी प्रकार सुरू आहे. काम बरोबर आहे कि नाही कशा पद्धतीने चालते हे पाहण्यासाठी रस्ते प्राधिकरण चे उपअभियंता तुषार शिरगुप्पे कधीच फिरकत नाहीत. यामुळे या महामार्गाचे काम कसे चालल हेच नेमका काय प्रकार चाललंय हेच कळेना. प्रस्तावित आराखड्याप्रमाणे काम सुरू नाही अनेक ठिकाणी रुंदीकरण होणे गरजेचे होते तसेही झाले नाही ठरावीक ठिकाणीच रुंदीकरण राजकीय वरदहस्त खाली अतिक्रमण असलेली दुकाने घरे तशीच आहेत. तसेच सदरच्या कामात दर्जा न सुधारल्यास येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे व उपाध्यक्ष विकास साबळे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments