Daily Mahasatta

Daily Mahasatta

महावितरणच्या नुकसानीचाअहवाल ऊर्जामंत्र्यांना देणार : पृथ्वीराज पाटीलसा


सांगली, (प्रतिनिधी)
कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली शहरात आणि नदीकाठच्या गावात महावितरणच्या विजेच्या खांबांचे, ट्रांसफार्मरचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची आज काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत जाऊन पाहणी केली. ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत उद्या सांगली दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळी या नुकसानीचा आढावा त्यांना सादर करणार  असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

शहरातील टिळक चौक, गावभाग,  सिद्धार्थ परिसर आदि ठिकाणी श्री. पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता  विनायक इदाते उपस्थित होते. यावेळी त्यांनी टिळक चौक, सिद्धार्थ परिसरमधील नागरिकांची विचारपूस केली.

महापुराच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने शहरी वार्डातील व ग्रामीण भागातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी अतिशय महत्वाची असल्याने त्याला प्राधान्य देण्याची भूमिका श्री. पाटील यांनी घेतली आहे. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी मी स्वतःच देखरेख ठेवतोय आणि प्रशासनाला उपयुक्त सूचनादेखील करतो आहे, असे त्यांनी सांगितले.
 
गेल्या दोन दिवसापासून, श्री. पाटील यांनी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे जंतूनाशक पावडरची फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले आहे. आज भारतनगर, गिरणार कॉम्प्लेक्स, रतनशीनगर, आदिनाथ नगर, आप्पासाहेब पाटील नगर, आयुक्त बंगला आदी ठिकाणी निर्जंतुकीकारणाचे  काम पूर्ण झाले.
----

Post a Comment

0 Comments