Daily Mahasatta

Daily Mahasatta

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा गुलाल केला नेत्यांची चरणी अर्पण

पेठ (रियाज मुल्ला) : स्व. हणमंतराव पाटील  (बुवा)विद्या प्रतिष्ठान ने नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतील विजय गुलाल अंगाला न लावता मिळालेली  विजयश्री आपल्या नेत्यांच्या चरणी अर्पण केली.
     
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना निवडणूकी मध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने घवघवीत यश मिळविले. यावेळी पेठ येथील स्वर्गीय हणमंतराव पाटील बुवा प्रतिष्ठानने  गुलालाची उधळण व विजय उत्सव साजरा न करता पेठ येथे स्व. हणमंतराव पाटील  बुवा यांच्या अस्थी विसर्जन केलेल्या वट वृक्षाला डॉ अभिजित हणमंतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. 
     
कृष्णा उद्योग समूहाचे संस्थापक जयंवतराव भोसले व जनसामान्यांचे आधारवड असलेले.स्व हणमंतराव पाटील यांच्या मैत्रीची नाळ जगजाहीर होती.  भोसले कुटुंबीयांवर  आयुष्यभर प्रेम करणारे आत्मशकती समुहाचे  संस्थापक स्व. हणमंतराव पाटील यांच्या निधनानंतर हि पहिली निवडणूक होती. यामुळे त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ प्रेम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी स्व. हणमंतराव पाटील यांच्या अस्थी विसर्जन केलेल्या वटवृक्षाला पुष्पहार अर्पण करून एक विजयी मानवंदना दिली.     
     
यावेळी आत्मशकती पतसंस्था चे संचालक शेखर बोडरे,विठ्ठल मदने, प्रताप पाटील, संतोष गायकवाड, सुरेश सातपुते, जयवंत थोरावडे, अरुण सातपुते, विकास पाटील,प्रकाश पाटणेकर उपस्थित होते. कृष्णा बँकेचे विद्यमान संचालक नामदेव कदम (भाऊ),माजी संचालक फिरोज ढगे (भैय्या),संग्राम वारके (काका) अरुण कदम,हेमंत देसाई, पतंग पाटील,नामदेव भांबुरे , संतोष गोंधळी यांनी देखील विजय उत्सवात प्रत्यक्ष सहभागी न होता आपल्या प्रिय नेत्यांस घरातूनच विजयी अभिवादन केले. तसेच स्व. हणमंतराव पाटील यांच्या घरी युवा नेते  अतुल पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयभाऊ पाटील,सुमित पाटील. विजय पाटील (नाना)राहूल रमेश पाटील, विकास मगदूम यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून  अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments