Daily Mahasatta

Daily Mahasatta

मिरजेचे अपेक्स प्रकरण विधानसभेत मांडणार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सांगली (प्रतिनिधी) : मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलमध्ये झालेला गैरप्रकार आपण विधानसभा पटलावर मांडणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली.

 मिरज येथील अपेक्स हॉस्पिटलचे डॉ.महेश जाधव आणि त्यांच्या गैरकारभारास जबाबदार असणाऱ्या महापालिकेचे अधिकारी व इतर प्रशासनातील अधिकारी ज्यांनी सदर कोविड हॉस्पिटलला अवैधरित्या परवानगी देणाऱ्या  महापालिका आयुक्त यासर्वांना सेवेतून बडतर्फ करून त्यासर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ व संघटक सरचिटणीस दीपक माने, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, व्यापारी आघाडी सह संयोजक रविंद ढगे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

'कोरोनाच्या काळात अपेक्स कोविड केअर हॉस्पिटल सुरु करण्यात आले होते. त्या हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर तेथे अनेक अवैध बाबी, नियमबाह्य बाबी व चुकीचे उपचार केल्याचे समोर आल्याने डॉ. महेश जाधव व इतरांवर गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  चुकीचे उपचार केल्याने ८७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते.यामुळे डॉ.महेश जाधव व इतरांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन सर्वाना अटकही झालेली आहे. 

डॉ.महेश जाधव यांच्यावर काही पोलीस ठाण्यात विविध तक्रारी व गुन्हे दाखल आहेत असे असतानाही या हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली. डॉ.जाधव यानी कोविड हॉस्पिटलला परवानगी मिळावी यासाठी महानगरपालिकेकडे ३ एप्रिल २०२१ रोजी अर्ज केला होता. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी १४ एप्रिल२०२१ रोजी परवानगी दिली. परंतु तत्पूर्वी ही परवानगी देताना राज्य शासनाच्या आयसीएमआर, डीएमईआर, डीएचएस या विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे,उपाययोजनांचे पालन अथवा पाहणी न करता परवानगी देण्यात आली आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments