Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात कडक निर्बंध


इस्लामपूर ता.( सुर्यकांत शिंदे)
      वाळवा तालुक्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर तालुक्यातील ४४ गावांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली. तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण हे शहरी भागात असून इस्लामपूर ६८९ मध्ये तर आष्टा शहरात २५५ एव्हढी रुग्ण संख्या आहे.
    तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.मिरज सांगली शहरांच्या पाठोपाठ जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील रुग्ण संख्या जास्त आहे.
 त्यानुसार आरोग्य विभागाच्या विशेष समितीने तालुक्याचा आढावा घेतला आणि  कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज जाहीर केला. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तालुक्यात कडक बंद पाळण्यात येणारी गावे व कंसात सध्याची रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे - कासेगाव (१०३), कामेरी (११०), वाटेगाव (६३), नेर्ले (६५), काळमवाडी (२९), बहे (२२), कापुसखेड (४३), पेठ (९४), बोरगाव (८९), साखराळे (३४), बानेवाडी (२०), मसुचिवाडी (२३), ताकारी (२७) गोटखिंडी (३८), मर्दवाडी (३१), मिरजवाडी (७५), बावची (५७), वाळवा (४१), नवेखेड (५१), जुनेखेड (२५), अहिरवाडी (३५), , येडेनिपाणी (४२), गाताडवाडी (२३), तुजारपूर (३८), शिरते (२७), किमगड (२६), येडेमच्छीन्द्र (३०), तांबवे (२०),  सुरुल (२३), ओझर्डे (३८), रेठरेधरण (२५), चिकूर्डे (२९), ऐतवडे खुर्द (६४), कुरळप (५५), वशी (२४), येलूर (५३), तांदुळवाडी (४३), कुंडलवाडी (२८), बहादूरवाडी (२०), कणेगाव (२३), बागणी (४२), ढवळी (२७), फार्णेवाडी (३९), कोरेगाव (३४).

Post a Comment

0 Comments