Daily Mahasatta

Daily Mahasatta

देवेन्द्रजी... आपणाकडे महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व म्हणून पाहत आहोत : सांगलीत नागरिकांनी केल्या भावना व्यक्त


सांगली (प्रतिनिधी)
 देवेन्द्रजी आपण आज सांगली मध्ये आलात आणि आम्हाला एक नवचैतन्याची ऊर्जा मिळाली आहे. सांगलीतील जनता पूर आल्यापासून विविध माध्यमासमोर आपण मुख्यमंत्री असताना जो आधार व मदत दिली त्याची आठवण जाहीर पद्धतीने मांडत आहेत. जी मदत तातडीने मिळाली व योग्य वेळी मिळाली त्याबद्दल आज ही लोक आपल्याकडे महाराष्ट्राचे सक्षम, कणखर, पारदर्शक नेतृत्व म्हणून पाहत आहेत. असे शामरावनगर येथील नागरिकांनि व्यक्त केले 

प्रभाग क्रमांक 18 मधील शामरावनगर परिसरात पाहणीसाठी आलात तो भाग पुराच्या काळात 40% पाण्याने प्रभावित होता. याच शामरावनगर परिसरात आपण मुख्यमंत्री असताना 100 कोटींचा निधी महापालिकेला दिला होता त्याच निधीतून 33 कोटीची रस्त्यांची भरीव कामे झाली म्हणून आज या भागातील नागरिक आज पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरापर्यंत अगदी सहज पोहचतायत. आपण दिलेला निधी आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ व प्रदेश सदस्य शेखर इनामदार यांनी केलेलं नियोजन आज ही लोक आवर्जून याचे कौतुक करतात. 

शामरावनगर परिसर हा शहराचा विस्तारित भाग असल्याने आणि या भागाचा भौगोलिक दृष्ट्या "बशी "(कप -बशी ) आकाराचा असल्याने पाणी साठून रहाते आणि म्हणून येथील पाणी हटविण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.याच भागातून शेकडो वर्षाचा नैसर्गिक नाला जो पाणी प्रवाहित करून अंकली मार्गे पुन्हा नदीला जात होता तो  प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे राजकीय लोकांनी प्लॉट्स पाडून नाले बुजवून टाकले आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना वरील समस्यांचे निपटारा करण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या. परंतु दुर्दैवाने महापालिकेतील आपली सत्ता गेल्यानंतर या भागाची परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे.

 1990 च्या दशकामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुमित मलिक यांनी अहवाल दिला होता की हा शामराव नगरचा भाग वसवला गेला तर भविष्यामध्ये एक वेळ अशी येईल या या भागाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. म्हणून या निवेदनाद्वारे आम्ही या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आपणास विनंती करतो की केंद्र सरकारच्या वतीने आपल्या मार्गदर्शनाखाली शामराव नगर परिसरासाठी तज्ञ समिती नेमून विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा व या समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून आम्हास न्याय द्यावा ही विनंती. 
या प्रसंगी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, आमदार सुरेशभाऊ खाडे, भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, ओबीसी मोर्च्या शहर जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, संघटन सरचिटणीस दीपक माने, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस आश्रफ वांकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेविका स्वातीताई शिंदे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष शरद भाऊ नलवडे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष अमित भोसले, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका कल्पनाताई कोळेकर, नगरसेविका सविताताई मदने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, राहुल माने, उदय बेलवलकर, समाज सेवक लियाकत शेख, शहाजी भोसले, सुमित शिंदे, निलेश जगदाळे, कुमार यादव, नाना मगदूम, रियाज वंटमोरे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments