Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणी अध्यक्ष व मंत्रालय विभाग प्रमुख पदी नितीनराजे जाधव यांची निवड

विटा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणी अध्यक्ष तसेच परिषदेच्या (मंत्रालयीन विभाग प्रमुख ) पदी सांगली जिल्ह्यातील आळसंद (ता.खानापूर) गावचे युवा नेते व माजी उपसरपंच नितीनराजे शहाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली. या निवडीबाबतचे पत्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वतीने. राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे शुभहस्ते देण्यात आले व सरपंच परिषदेच्या मुंबई येथील बैठकी दरम्यान त्यांनी जाधव यांना या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
          
कागल येथे नुकत्याच काही दिवसापूर्वी सरपंच परिषदेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर , सोलापूर येथील प्रमुख शंभर लोकनियुक्त महिला व पुरुष सरपंच पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज करताना सरपंचांना कामकाजामध्ये येणाऱ्या विविध अडीअडचणी नामदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या. बहुतांश मागण्या मान्य करत तात्काळ प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
           
नितीनराजे जाधव यांना ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांची जाण असल्याने, व शासन दरबारी त्यांना कामकाजाची माहिती असल्याने सरपंच व ग्रामपंचायतींना हक्क व न्याय मिळवून देण्याकरिता तसेच शासनस्तरावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा करून ग्रामीण महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान पाहता इतर गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व गावगाडा चालवणार्‍या आपल्या सहकार्‍यांना संघटीत करुन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विकासात्मक व रचनात्मक कार्यात त्यांना सहभागी करुन घ्यावे याकरिता परिषदेच्या सर्वानुमते नितीनराजे जाधव यांची निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
     
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल  ढिकले, उपाध्यक्ष शशिकांत मोरे,  महिला कार्याध्यक्ष वर्षा निकम, व परिषदेचे मार्गदर्शक सांगोलेचे माजी आदर्श सरपंच सुशांत देवकर ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने, रायगड जिल्हा संघटक नंदू भोपी, पुणे विभाग सचिन जगताप ,व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments