Daily Mahasatta

Daily Mahasatta

फलक रेखाटनातून पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन


पेठ(रियाज मुल्ला)
एक काळ रात्र , निसर्गाचे रौद्र रूप, वरूण राजाचे थैमान आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं,,,. कोरोनातून सावरता सावरता महापुराचं संकट अनेक कुटुंबाच्या उरावर कोसळलं आणि अनेकांच्या जीवणाचा खेळ खल्लास झाला. उध्वस्त होणं व जीवनाची राखरांगोळी होणं ते हेच. 
   
 कोल्हापूर, सांगली,सातारा,रायगड, रत्नागिरी, अकोला इ.क्षेत्रातील अनेक कुटुंबच्या कुटुंब महापुरामुळे बेघर झाली, अनेकांच्या संसाराचा चिखल झाला. काडी काडी ने जोडलेला संसार डोळ्यांदेखत पाण्यासह वाहून गेला. तळीये (जि. रायगड) या ठिकाणी तर दरड कोसळून माणसं ढिगाऱ्याखाली जिवंत गाडली गेली. कित्येक माणसं व प्राण्यांचा बळी गेला.शिल्लक राहिलं ते फक्त हृदय सुन्न करणारं दृष्य आणि हंबरडा फोडणारा टाहो.
  संकटाला सामोरे जाण्याची व संकटकाळात साथ देण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मग संकट देशाच्या कोणत्याही भागात असो.संकटकाळी भक्कम पणे उभे राहून एक हात मदतीचा' ही आपली रीत आहे. 
  चला तर मग ...पूरग्रस्त उध्वस्त परिवारास सढळ हाताने मदत करूया..! या आशयाचे फलकलेखन कासेगांव शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूल, बावची ता. वाळवा जि. सांगली चे कलाशिक्षक श्री.अविनाश कांबळे यांनी रंगीत खडूच्या साहाय्याने रेखाटना द्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments