Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली

कुपवाड (प्रतिनिधी) : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत.भरमसाठ केलेली ही दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना न्याय व आधार  द्यावा या मागणीसाठी कुपवाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष , नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुपवाड शहरातून सायकल रॅली काढली. 

सायकल रॅली ची सुरुवात कुपवाड सोसायटी चौकातून झाली तेथून महावीर व्यायाम शाळा ,सिद्दार्थ नगर चौक,धनगर गल्ली,थोरला गणपती चौक,लिंगायत  गल्ली मार्गे कुपवाड चावडी चौकातून तराळ गल्ली,तेथून पुढे मेंन रोड मार्गे ही रॅली काढण्यात आली.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले,केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.उद्योग,व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करून लोकांना दिलासा द्यावा.पेट्रोल, डिझेल,गॅस आणि खाद्यतेलाच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत.भाजपाने आपल्या जाहिरनाम्यामध्ये 2014 ला असणारे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये भाववाढ करणार नाही असे आश्वासन दिले होते.  परंतु पेट्रोल व डिझेल चे दर आता शंभरी पार झाले आहेत.याचाच भाजप सरकारला जाब विचारणेसाठी ही सायकल रॅली आहे.

कुपवाड जिल्हा परिषद शाळेसमोर सायकल रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी सायकल रॅलीत कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर मुजावर, सांगली शहर चिटनीस अरुण रूपनर,सरचिटणीस अजय माने, अशोक रास्कर,माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, कुलभूषण कर्नाळे,राहुल पाटील, देषभूषण कर्नाळे, सिकंदर मुल्ला, श्रीकृष्ण कोकरे, सकलेन मुजावर,अविनाश पवार, अनिस मुजावर, सिद्धू मुरडी, सूरज धोतरे,शुभम धोतरे, सिद्धांत धोतरे, विशाल धोतरे, संकेत कांबळे, अनिकेत धोतरे, अक्षय धोतरे, रुनेश धोतरे,रोहीत वाघमारे, सुशांत धोतरे,पंकज धोतरे,काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments