Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ‘स्वतंत्र विद्यापीठा’ ची निर्मिती व्हावी : सुरेश पाटील

सांगली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सांगली जिल्हयात शिवाजी विद्यापिठाच्या उपकेंद्रास तत्वतः मान्यता दिली आहे. तालुक्यातील विविध ठिकाणाहुन आप-आपल्या भागात उपकेंद्र स्थापनेबाबत मागणी होत असली तरी सांगली शहराजवळ 'उपकेंद्रा' ऐवजी ‘स्वतंत्र विद्यापीठाची’ निर्मिती झाली पाहिजे. अशी भूमिका सांगली येथे ‘व्हिजन सांगली @75’ फोरम तर्फे आयोजित चर्चासत्रात शिक्षणक्षेत्रातील तज्ञांनी आपली भूमिका व्यक्त केली.
              
चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर होते. यावेळी भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्रा.टी.आर सावंत मिरज महाविद्यालयाचे उपचाचार्य एम. व्ही. पाटील, प्रा. श्रीधर शिंदे,  श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मानसी गानू , श्रीमती कस्तुरबाई महाविद्यालयाचे डॉ. पी. एन. चौगुले,  नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. शीतलकुमार पाटील, चिंतामणराव व्यापार  कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट आदि मान्यवर उपस्थित होते.
       
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. ताम्हणकर म्हणाले, जिल्हयातील सर्वच महत्वाच्या शैक्षणिक संख्या सांगली, मिरज परिसरात आहेत. उपकेंद्र कोठेतरी आडवळणी भागात नेल्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल. सध्या ऑनलाइन शिक्षण मोठ्या प्रमाणावर आहे तसेच नेट- कनेक्टिविटी सुद्धा महत्वाची आहे. उपकेंद्र हा राजकीय विषय नसून, शैक्षणिक व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. सोयी - सुविधांच्या दृष्टीने उपकेंद्रासाठी सांगली अथवा मिरज मध्यवर्ती ठिकाण ठरेल.

यावेळी चिंतामणराव कॉलेज चे प्राचार्य डॉ. बापट सर म्हणाले, नविन केन्द्रशासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यापीठाचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. त्यासाठी सांगलीला स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक आहे.
        
यावेळी प्रास्ताविकात व्हिजन फोरमचे मुख्य समन्वयक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, सोलापुरला सांगली पेक्षा कमी  महाविद्यालये असताना स्वतंत्र विद्यापीठ होवू शकते, तर सांगली जिल्ह्यातील एकुण विद्यार्थी संख्येच्या आणि शहराच्या विद्यापीठांशी संबधित जवळ जवळ 75 टक्के विद्यार्थी हे सांगली शहर व् आसपासच्या परिसरात शिकतात. तालुक्यातील विद्यार्थी व् प्राध्यापक व् पालक यांच्या साठी सांगली व् मिरज हे मध्यवर्ती ठिकाण योग्य आहे.
        
ते म्हणाले स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास येथील विद्यार्थी तसेच अभ्यासक यांना नविन कोर्सेस तसेच जगातील विद्यापीठांबरोबर संलग्नता मिळू शकेल. आणि जिल्ह्याच्या व्यापार, उद्योग शेती विध्यार्थ्याना संधी उपलब्ध व्हावी यासाठी तांत्रिक मनुष्यबळ तयार करण्यासाठी नविन अभ्यासक्रम मिळेल. भविष्यामध्ये स्वतंत्र विद्यापीठ काळाची गरज आहे. त्यामुळे उपकेंद्र हे सांगली – मिरज जवळ होण्याबरोबरच स्वतंत्र विद्यापिठासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कॉलेज/संस्था मोठ्या प्रमाणावर विद्यापिठाशी संलग्न आहेत. सोलापूरला ६२ कॉलेजेस संलग्न आहेत. नविन केंद्रीय धोरणाप्रमाणे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी संयुक्तिक ठरेल. तालुक्यातील एक-दोन गावांचा उपकेंद्रामुळे विकास होण्यापेक्षा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विकास महत्वाचा आहे. उपकेंद्राऐवजी सांगली शहराजवळ ‘स्वतंत्र विद्यापीठ’ ची निर्मिती झालीच पाहिजे. यासाठी आवश्यक असणारी जागा या परिसरात उपलब्ध आहे. प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर संघटना यांची मते विचारत घेवून लवकरच रितसर प्रस्ताव पालकमंत्री जयंत पाटील व शिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
        
यावेळी उपस्थित शिक्षणक्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी स्वतंत्र विद्यापिठासाठी आवश्यक असणा-या सुविधा, वीज, पाणी, इंटरनेट. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, कुशल मनुष्यबळ सांगली मध्ये तात्काळ उपलब्ध होवू शकते. मिरज हे येथे रेल्वे जंक्शन असल्याने इतर राज्यातून अथवा जिल्ह्यातून या ठिकाणी येणे सोईचे होईल असे मत व्यक्त केले.
       
याप्रसंगी व्हिजन फोरमचे वसंत पाटील, मोहन चौगुले, उपस्थित होते. स्वागत प्राचार्य शीतलकुमार पाटील यांनी व आभार व्हिजन फोरमचे सचिव राजगोंड पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments