Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ११७४ पॉझिटिव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात  आज सोमवारी एकाच दिवशी ११७४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच दिवसभरात सांगली जिल्ह्यातील २० व अन्य जिल्ह्यातील ४ असा एकूण २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात निर्बंध कडक झाल्यानंतर देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर रुग्ण संख्या एक हजार च्या वर पोहचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये लहान मुलांची वाढती संख्या चिंता असल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९९६१ वर पोहचली आहे.  जिल्ह्यात आज ९६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी ५६ जत ५७, कडेगांव ११२, कवठेमहांकाळ ६९,  खानापूर १०७, मिरज १२९ , पलूस ९३, शिराळा ९३ , तासगाव १०२, वाळवा २३४ तसेच सांगली शहर ९४ आणि मिरज शहर २८ असे जिल्ह्यात एकूण ११७४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments