Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात व्यापार सुरू करण्यास परवानगी द्या

: कुपवाड शहर व परिसर खोकी चालक मालक संघटनेची मागणी
कुपवाड (प्रमोद अथनिकर) : कुपवाड शहर व परिसर खोकी चालक संघटनेच्या वतीने कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत व्यापार, व्यवसाय पूर्ववत चालू करण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन गुरुवारी शहरातील सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले आहे, आम्ही सर्व छोटे-मोठे व्यवसायधारक असून कुटुंबाचा चरितार्थ आमच्या व्यवसायावर अवलंबूनआहे. शासनाच्या सर्व नियमांचे आम्ही आजपर्यंत काटेकोरपणे पालनकेले असून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन न करता प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. परंतु गेली दिड वर्षात आमची परिस्थिती फार खालावली असून सध्या जगणे  मुश्कीलीचे झाले आहे . तरी आम्हाला सर्व नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी देणेत यावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी खोकी चालक संघटनेचे अध्यक्ष महादेव
मगदूम, शाम भाट, रवी अदाटे, सुभाष मगदूम, गणेश सूर्यवंशी, दगडू कोरे, बाबासाहेब जमदाडे, प्रवीण गौंडाजे, रोहित दुधाळ, सुरेश हजारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments