Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात हप्ते वसुलीसाठी दादांची नेमणूक, जुगार, मटका जोमात

कुपवाड  (प्रमोद अथनिकर )

    कुपवाड शहर परिसरात मटका व तीन पानाचा जुगार यासारख्या अनेक अवैध धंद्याना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहेत. मटका व तीन पत्ती जुगार अशा धंद्यांचा सुळसुळाट या क्षेत्रात झाला असून गोरगरीब तसेच सर्वसामान्य कुटुंबे  उदध्वस्त होऊ लागली आहेत. या अवैध व्यवसायिकांकडून हप्ता वसूलीसाठी कुपवाड पोलीस ठाण्यातील काही खास ' दादांची ' नेमणुक करण्यात आली आहे.

कुपवाड शहरात स्थानिक पोलिस यंत्रणेकडून मटका व अवैध व्यवसायाला अभय दिला जात आहे.  कुपवाड औद्योगिक क्षेत्रा मधील चाकण चौक, दत्तनगर चौक व मेनन चौकाच्या टपरीवर उघडपणे मटका व्यवसाय सुरु आहे. काही चहा च्या टपरीवर आणि  छोट्या हॉटेलमध्ये ही या व्यवसाय चालू आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे  दुकाने बंद केली जात असताना अवैध धंदे मात्र चालू असल्याने कुपवाड शहरात चर्चा रंगू लागली आहे. तसेच कुपवाड परिसरापासून थोड्या अंतरावर तीन पत्ती जुगार ही चालू आहे. याकडे पोलीसाचे दुर्लक्ष केले असून याच्या पाठीमागील रहस्य नेमके काय असे  नागरिकाच्यातून बोलले जात आहे.
     
मटका घेण्यासाठी काहीजणांनी तर त्यासाठी मोबाईलचा वापर  सुरू केले आहे . मोबाईल वरून आकड्यांचा खेळ घेतला जातो व पैशांची देवाण - घेवाण सोयीने केली जाते . कुपवाड हे शहर मटका गांजा यासारख्या अवैध व्यवसाय यांचे माहेर घर बनले आहे . कुपवाड शहर पोलीस ठाणे  पोलिसांना या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दर महिन्याला मलिदा दिला जातो अशी उघडपणे नागरिकातुन चर्चा होत आहे.

एकीकडे अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत चालू होऊ देणार नाही , अवैध व्यवसायिकरांना पायबंद घालण्याची घोषणा केली जाते मात्र घोषणा करणाऱ्या जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारेच काही पोलीस अधिकारी आणि त्यांचे वर्दीतील हस्तक असणारे पोलीस कर्मचारी मटका व अवैध व्यवसायातील लोकांकडून त्यांच्या नावावर हप्ते वसूल करतात.  कुपवाडतील मटक्याचा व्यवसाय पाच ते सहाजणांकडे केंद्रित झालेला आहे . मटक्याचा व्यवसायातील लहान व्यावसायिकावर वारंवार धाड पडते . अशा कारवायांतून मोठे व्यावसायिक जाणीवपूर्वक लांब ठेवले जातात. त्यामागे स्थानिक पोलिसांची तडजोडीची आणि अर्थपूर्ण देवघेवीची भूमिका असल्याचे वेळोवेळी दिसून येते.  सांगली मिरज आणि कुपवाड व तिन्ही शहरांमध्ये मटक्याचा व अवैध व्यवसायावर धडक कारवाईची गरज आहे .
     

Post a Comment

0 Comments