Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीचा धावपटू मोहन चोरमुले यांना सुवर्णपदक

सांगली (प्रतिनिधी) : 26 जून 2021 रोजी हॉंगकॉंग शहरात आयोजित करण्यात आलेल्या 42 किलोमीटर अंतराच्या धावण्याच्या फुल मॅरेथॉन स्पर्धेत सांगलीचा धावपटू मोहन चोरमुले यांनी जागतिक क्रमवारीत 7 वा क्रमांक पटकावून भारतात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले आहे, त्यासोबत 50-54 वयोगटात यांनी 3 तास 41 मिनिटं इतकी विक्रमी वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले आहे, या स्पर्धेत मेक्सिकोच्या धावपट्टू हेक्टर ग्रझा यांने सुवर्णपदक पटकावले आहे.

ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेत जगभरातील जवळपास 2 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता, या स्पर्धेत आमच्या संस्थेचे धावपट्टू आकाश चव्हाण,असलम मुरसल,ओमकार शिलवंत,रोहित कटारे,नंदकुमार टोनमारे यांनी सहभाग  घेतला होता मोहन चोरमुले यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, यासाठी त्यांना डॉ सरकार, जलतरण ग्रुप चे संस्थापक अशोक चव्हाण, जेष्ठ प्रशिक्षक गोपाळ मर्दा मार्गदर्शन लाभले, आर्मी मॅन ग्रुप, कृष्णा माई स्वच्छता अभियान, कृष्णामाई स्वच्छता, कृष्णामाई जलतरण संस्था, ओमगणेश कलाक्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments