Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील आदर्श इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरु

विटा (प्रतिनिधी) : दहावी नंतर प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत सुविधा केंद्र (FC सेन्टर) म्हणून आदर्श इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा ला तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास महाडिक यांनी दिली.

प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ३० जुन ते २३ जुलै २०२१ अखेर शासनाकडून मुदत देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे व माहिती आधारे ऑनलाईन अर्ज भरून देणेसाठी महाविद्यालयाकडून मोफत सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी द्वारे कागदपत्रे अपलोड करून अर्ज निश्चिती हि दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत करावयाचीआहे. दिनांक २६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. अर्ज दुरुस्ती करणेसाठी २७ जुलै ते २९ जुलै अशी मुदत आहे. अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध होईल. 

महाविद्यालयात उपलब्ध सुख सोयी, प्रशिक्षित स्टाफ व उपकरणे उपलब्ध असलेने शासनाकडून महाविद्यालयास हे सुविधा केंद्र मंजूर झाले आहे. या सुविधा केंद्रामुळे खानापूर, तासगाव, आटपाडी, कडेगाव तसेच मायणी  तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 

विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये अर्ज करून प्रवेश प्रक्रिये मध्ये सहभाग नोंदवावा.  तसेच या प्रवेश प्रक्रियेसंबंधी प्रश्न, शंका यांचे निरसनासाठी ७७५५९००५०० / ७७५५९००७७७ / ९३२५९२५२७२ या क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments