Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना योद्धा पत्रकारांचा सत्कार रणरागिणी महिला प्रतिष्ठानच्या वतीने

पलुस (अमर मुल्ला) : कोरणा विषाणूने देशभरात थैमान घातलेले असताना जीवाची परवा न बाळगता कर्तव्य भावनेतून प्राप्त परिस्थितीचे वार्तांकन करीत पत्रकार बांधवांनी ही भूमिका चोक बजावली आहे. त्यांच्या कार्याला दाद दिली पाहिजे असे प्रतिपादन रणरागिणी महिला प्रतिष्ठान आष्टा चे संस्थापक अध्यक्ष व व्याख्याते संदीप कुडचीकर यांनी वाळवा येथे बोलताना केले. येथील हाळभाग अंगणवाडीच्या सभाग्रहात स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रणरागिणी महिला प्रतिष्ठान व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरणा योद्धा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी  रणरागिनी प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष गणेश मदने जिल्हा अध्यक्ष सुवर्णा शेंडगे सचिव रवी सुरवसे सदस्य सागर देवळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र  व पुष्पगुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला यावेळी बजरंग गावडे यांनी पत्रकारांचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविका व रणरागिनी जिल्हाध्यक्ष सुवर्णा शेंडगे व परिसरातील अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले अंगणवाडी सेविका मंदाकिनी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी पत्रकार नंदकुमार कुलकर्णी ,महेंद्र किनीकर , मौसिम वांकर व जमेल सदे बजरंग गावडे तसेच सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments