Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रोलर दाखल

: महापौरांच्याहस्ते लोकार्पण
सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात आता दोन अत्याधुनिक रोडरोलर दाखल झाले आहेत. यामुळे आता महापालिका क्षेत्रातील पॅचवर्क यंत्रणा अधिक भक्कम झाली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पाठपुराव्यामुळे दोन रोलर दाखल झाले असून महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते या रॉलरचे लोकार्पण करण्यात आले.
     
हे अत्याधुनिक रोलर असून यामुळे रोडचे डांबरीकरणं किंवा पॅचवर्क मजबूत होणार आहे. या रोलरला व्हायब्रेट सिस्टीम असल्याने आणि स्प्रिंकलर असल्याने यामुळे रस्ता मजबुतीकरण योग्य रीतीने होते. जेसीबी कंपनीचे हे दोन रोडरोलर महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. आज महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, सभापती पांडुरंग कोरे, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक विष्णू माने, संजय यमगर, प्रकाश मुळके, शेडजी मोहिते, फिरोज पठाण, मनगू सरगर, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments