Daily Mahasatta

Daily Mahasatta

चरण येथील दुकान फोडले, 31 हजार लंपास


शेडगेवाडी ( याकुब मुजावर)                
शिराळा तालुक्यातील चरण सोंडोली फाटा येथील धनश्री ट्रेडींग कंपनी किराणा दुकानात रोख रक्कम व मालासहित 31 हजार 600 रूपयेची चोरी चोरट्याने केली असून कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोंडोली पुलामुळे चरण गावची बाजार पेठ नावारूपास येऊ लागल्याने व्यापारी, चरण सोंडोली फाट्यावर वेगवेगळी दुकाने सुरु करत आहेत. या ठिकाणी फिर्यादी सोमनाथ पांडुरंग नायकवडी रा.चरण यांच्या मालकीचे धनश्री ट्रेडर्स कंपनी हे होलसेल व रिटेल किराणा दुकान आहे. रविवारी दुपारी चार वाजता हे दुकान बंद करण्यात आले, त्या रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरची पट्टी तोडून दुकानातील रोख रक्कम 10 हजार, सी सी टी व्ही ची हार्डडिस्क किंमत 2000 हजार रुपये, व इतर साहित्य 19,600 रुपयांचे मिळून 31,600 रुपयांची चोरी केली आहे. दुकानाचे मालक सोमवारी सकाळी दुकान उघडायला आल्यावर चोरीची घटना निदर्शनास आल्यावर तातडीने त्यांनी पोलिसांना कल्पना दिली.
घटनेची नोंद कोकरूड पोलिसांत करण्यात आली असून अधिक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

Post a Comment

0 Comments