Daily Mahasatta

Daily Mahasatta

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने 2 हजार पुरग्रस्त रुग्णांची तपासणी व औषध उपचार

इस्लामपूर : (हैबत पाटील) 
वाळवा , मिरज तालुक्यातील कृष्णा नदी काठच्या पूरग्रस्त गावांमधे राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल यांच्या वतीने आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते . या मध्ये वाळवा व मिरज तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थितीतील  2 हजार रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे राज्य उपाध्यक्ष  डॉ .अतुल मोरे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व ना. जयंतरावजी पाटील  जलसंपदा मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व डॅा .नरेंद्र काळे अध्यक्ष राष्ट्रवादी डॅाक्टर सेल यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात
 वाळवा तालुक्यातील कोळे.150,  नरसिंहपूर  350,बहे 500,
मौजें डिग्रज- 450,दुधगाव- 350, माळवाडी- 300,  अशाप्रकारे जवळपास 2000रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. तर  बहे येथे ही  मारुती मंदिराच्या मंडपा मध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते विजय पाटील बापू व्हा. चेअरमन राजाराम बापू साखर कारखाना, राष्ट्रवादीचे संजय बापू पाटील , बाळासाहेब बापू पाटील,विठ्ठलराव पाटील तात्या संचालक राजाराम बापू साखर कारखाना, इस्लामपूर चे सुप्रसिद्ध डाॅ.अतुल मोरे , डॉ. रुपाली शेडगे , डॉ.प्रियांका सुर्यवंशी,मनोज पाटील उपसरपंच बहे,सौ.वैशाली पाटील उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवा तालुका,अशोकराव देशमुख चेअरमन बहे सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित बहे, नामदेव कारंडे दादा व्हा.चेअरमन बहे सोसायटी,बाबासो मुल्ला, हणमंत पाचुब्रे, सुभाष आरबुने, शिवाजी पाटील, रोहीत तोरस्कर, राजाराम थोरात, जालिंदर देशमुख, जालिंदर पाटील.सुभाष पाटील आण्णासाहेब तलाठी बहे,अशोक खोत.जयदिप पाटील कृषी अधिकारी बहे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, रामराव पवार आबा, बहे ग्रामपंचायत स्टाफ, इतर मान्यवर व बहे ग्रामस्थं उपस्थित होते.शिबिराला मार्गदर्शन डॉ अतुल मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयदीप पाटील भैय्या यांनी केले व उदय पाटील यांनी आभार मानले.
सदर शिबिराचे सर्व संयोजन डॉ. अतुल मोरे -उपाध्यक्ष राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल महाराष्ट्र, डॅा पृथ्वीराज पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी डॅा सेल सांगली जिल्हा डॅा.राहूल सुर्यवंशी, ( विटा) चिटणीसडॅा सेल सांगली,डॉ. अनिल माळी- अध्यक्ष वाळवा तालुका राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल डॉ. दिलीप साळुंखे अध्यक्ष इस्लामपूर शहर राष्ट्रवादी डॉसेल ,डॉ. विनय राजमाने सचिव राष्ट्रवादी डॅा सेल इस्लामपूर,डॉ.विकास पाटील सचिव इस्लामपूरमेडिकलअसोशिएशन,डॉ.सौ.प्रियांका सुर्यवंशी,डॉ. सौ.डॅा रूपाली शेडगे,डॅा विजय कवटगी फिरोज शेख फार्मसिस्ट के.एस.ई. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी यांनी केले.

Post a Comment

0 Comments