Daily Mahasatta

Daily Mahasatta

बोरगांव जवळ अपघात; 2 ठार तर 4 जण जखमी

वाळवा (रहिम पठाण)

बोरगाव ता. वाळवा येथील
जखमी व मृत्यू झालेले सर्वजण कडेगाव तालुक्यातील
बोरगाव ताकारी रोड वरील  वंजारी मळा परिसरामध्ये चालकाचा चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने दोन युवक जागीच ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. शुभम सयाजी सूर्यवंशी व अक्षय सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. जखमी झालेल्यांची नावे हरी आनंद सूर्यवंशी, दिपक जगन्नाथ सूर्यवंशी, विकास भार्गव सूर्यवंशी व अक्षय विठ्ठल सूर्यवंशी अशी नावे आहेत.

अपघातात चारचाकी (गाडी क्रमांक MH 12  MF-6282) इस्लामपूर कडून बेलवडे गावाकडे  मधून  निघाले होते. अचानक चालकाचा ताबा सूटल्यानेच बाजूला असणाऱ्या ऊसशेतीमध्ये 15- 20 फूट गाडी घूसली व हा अपघात घडला. अपघाताची तिव्रता एवढी होती की यामधील दोनजणांचा मृत्यू झाला आहे. जखमीना इस्लामपूर व खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

आपघाताची माहीती बेलवडे गावात समजताच नातेवाईक व गावातील लोकांनी अपघात स्थळी धाव घेतली अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस स्टेशनला झाली आहे.

Post a Comment

0 Comments