Daily Mahasatta

Daily Mahasatta

श्री शांतिसागरजी महाराज यांची 149 वी जयंती साजरी

सांगली (प्रतिनिधी)

दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने गुरूवार दिनांक 29 जुलै 2021 रोजी 20 व्या शतकातील प्रथमाचार्य प पू. 108 श्री  शांतिसागरजी महाराज यांची 149  वी जयंती साजरी करण्यात आली.  पूज्य आचार्यश्रीं यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुनिश्रींनी निर्ग्रंथ मुनि दीक्षा घेऊन कित्येक शतके खंडित झालेली निर्ग्रंथ मुनिपदाचे पुनरूज्जीवन केले. निष्कलंक आचरणाने एक आदर्श निर्माण करून प्रचंड धर्मप्रभावना केली. समाजामध्ये जागृती-नवचैतन्य निर्माण केले. समाजातील कुरूढी, अंधश्रध्दांचा त्याग करण्यास त्यांनी प्रवृत्त केले.  आयुष्यभर धर्मप्रणीत राहून शेवटी 1955 साली समाधीमरण स्वीकारले.  आधुनिक काळात संस्कृतिच्या इतिहासाला कलाटणी देणारे आचार्यश्री शांतिसागर महाराज यांचे कार्य जोमाने पुढे चालविण्याचे व समृद्ध करण्याचे कार्य अनेक मुनिगण आजही करीत आहेत. हे आपल्या सर्वांचे परमभाग्याची गोष्ट आहे.
यावेळी सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील, विभागीय ट्रस्टी पोपटलाल डोर्ले, उपाध्यक्ष प्रशांत पाटील-मजलेकर, बा.भु.पाटील ग्रंथ प्रकाशनचे चेअरमन डॉ. सी.एन.चौगुले, महिला परिषद सेक्रेटरी सौ. अंजली कोले, कळंत्रे श्राविकाश्रमच्या जॉ. सेक्रेटरी सौ. सुनिता चौगुले, सुपरिटेंडेंट विजया कर्वे, योगेश खोत आदि मान्यवर उपस्थित होते.
***

Post a Comment

0 Comments