Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊन शिथील, पाहा प्रशासनाचा आदेश सविस्तर

सांगली (प्रतिनिधी) : राज्य शासनाकडील आरोग्य विभागाकडून निर्गमित केलेल्या दि. 3 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याच्या कोव्हीड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्य शासनाकडील आदेशान्वये राज्यातील जिल्ह्यांना 1 ते 5 स्तर (Level) मध्ये विभागले आहे. दिनांक 03 जून रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर 14.01 टक्के आहे. राज्य शासनाकडील आदेशानुसार सांगली जिल्हा स्तर 4 मध्ये मोडत असल्याने स्तर 4 साठी निर्धारित केलेले प्रतिबंध सांगली जिल्ह्यात लागू करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाकडील आदेशान्वये दिलेल्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यात दि. 7 जून 2021 रोजीचे सकाळी 5 वाजल्यापासून ते दि. 14 जून 2021 रोजीचे सकाळी 5 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
1. कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी 
-
अ. सांगली जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे.
ब. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. 
क. खाली नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. 
ड. खालील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. 
इ. सदर आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना (Exemption Category मुद्दा क्र..5 मध्ये नमूद बाबी व आस्थापना) यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

2. अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल
-
1) रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.
2) व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ॲनिमल केअर शेल्टर्स. 
3) वनविभागाने घोषित केले प्रमाणे वनीकरण सबंधित सर्व कामकाज. 
4) सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दुध व दुग्ध पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स व सर्व प्रकारची खाद्य दुकाने (मटन, चिकन, पोल्ट्री, मासे व अंडी यांसह) सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहील. माल वाहतूक सेवा सुरु असलेने सदर वस्तूंचा माल हा सबंधित दुकानात उतरविणे अथवा चढविणेच्या प्रक्रियेस सदर वेळेचे बंधन असणार नाही. सदर दुकानामधून घरपोच सेवा सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल. 
5) कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केट मधील सर्व व्यवहार सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी लोकांची गर्दी होणार नाही / राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कॉव्हीड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेत येईल याची दक्षता पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी घेणे बंधनकारक राहील. सदर ठिकाणी कोव्हीड-19 नियमांचे उल्लंघन होत असलेचे निदर्शनास आलेस सदर आस्थापना बंद करणेचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असतील. 
6) दुध संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया कोणत्याही प्रतिबंधाशिवाय सुरु राहतील. 
7) जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंड्या सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 सुरु राहतील. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार बंद राहतील. 
8) शीतगृहे व गोदाम सेवा.
9) सार्वजनिक वाहतूक - रेल्वे, टैक्सी, रिक्षा व सार्वजनिक बसेस. 
10) स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम
11) स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा.
12) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे विहित केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा.
13) भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज (stock exchanges), डिपॉजिटर्स (Depositories) व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स (Clearing Corporations) व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट.
14) टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा.
15) वस्तूंची वाहतूक.
16) पाणीपुरवठा सेवा.
17) शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणाऱ्या बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या, तसेच पशुखाद्य दुकाने यांच्या आस्थापना सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. सदर दुकानामधून घरपोच सेवा सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल. 
18) सर्व वस्तूंची आयात व निर्यात.
19) ई u व्यापार ( फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी ).
20) प्रसार माध्यमे (Media).
21) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम सबंधित उत्पादने.
22) विद्युत व गॅस पुरवठा सेवा.
23) सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा { मालवाहतूक वाहनामधून दोन व्यक्ती (वाहन चालक + स्वच्छक / मदतनीस) पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करणेस प्रतिबंध असेल. जर एखादे माल वाहतूक वाहन हे महाराष्ट्र राज्याबाहेरून येत असेल तर मालवाहतूक वाहनामधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडे (वाहन चालक + स्वच्छक / मदतनीस) महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतेवेळी मागील 48 तासातील निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल असणे बंधनकारक असेल, तसेच सदरचा निगेटिव्ह RTPCR अहवाल हा पुढील 7 दिवसासाठी वैध राहील }.
24) मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरु राहतील. तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकानधारकांनी सरळ गॅरेज मध्ये करणेस परवानगी असेल. स्पेअरपार्ट ची दुकाने सुरु ठेवणेस प्रतिबंध असेल.
25) डेटा केंद्रे (Data Centers) / क्लाउड सेवा वितरक (Cloud Service Provider) / पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा (IT Service).
26) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.
27) ATM’s.
28) टपाल सेवा.
29) बंदरे आणि सबंधित सेवा. 
30) लस / औषधे / जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाउस एजंट (Custom House Agent) / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (Multi Modal Transport Operators). 
31) कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging meterial) ची उत्पादन केंद्रे.
32) व्यक्ती अथवा संस्थांसाठी पावसाळयामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारी केंद्र.
-
वर नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.

1. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण / संस्था यांनी हि बाब लक्ष्यात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध / निर्बंध नसून सदरचे निर्बंध / प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत.
2. यामध्ये नमूद सर्व सेवांची वाहतूक हि वर नमूद 1(ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
3. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळकाळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे. (Principal is essential for essential is essential.)

3. या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खाली निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
-
अ. संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारी व ग्राहक हे कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.
ब. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी.
क. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर र.रु.500/- इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड-19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना / दुकान बंद केले जाईल.
ड. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
-
इ. या आदेशामध्ये 2 - (3) मध्ये नमूद केलेनूसार किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती अनुषांगीक उपाययोजना कराव्यात. कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देता येतील. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवेची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. स्थानिक प्रशासनास आवश्यकता भासल्यास वरील सेवाबाबत काही सार्वजनिक ठिकाणे ही कायमस्वरूपी बंद करता येतील.
फ. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.
-
4. सार्वजनिक वाहतूक - सार्वजनिक वाहतूक पुढीलप्रमाणे सुरु राहील. रिक्षा - चालक + 2 प्रवासी. टैक्सी ( 4 चाकी ) - चालक + RTO नियमाच्या 50 % प्रवासी. बस – राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेता येईल आणि कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करू शकणार नाही.

i. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. 
ii. टैक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.
iii. प्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
iv. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड-19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टैक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.
v. सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
vi. सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवातुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश 

Post a Comment

0 Comments