Daily Mahasatta

Daily Mahasatta

जयवंतराव भोसले सहकार पॅनेल उच्चांकी मताने निवडून येणार : संग्राम देशमुख

कडेगांव (सचिन मोहिते) : कृष्णा कारखान्याच्या उभारणीस  घाटमाथ्यावरील सभासदांचे मोठे योगदान राहिले आहे. भोसले कुटुंबाचा स्वाभिमान,  सभासदांना न्यायदान करण्याचा, प्रामाणिकपणा आणि शब्दाला जागणारे नेतृत्व असल्यानेच सभासद जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या पाठी ठाम उभे राहुन उच्चांकी मताध्याकाने निवडून देणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा. संग्राम देशमुख यांनी केले.

ते आसद (ता.कडेगाव ) येथे य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बु. पंचवार्षिक निवडणूक २०२१-२६ जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ घाटमाथ्यावरील  सभासदांच्या भेटी-गाठी संवाद दौर्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी भाजापा कडेगाव तालूकाध्यक्ष धनंजय देशमुख,सभापती मंगलताई क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे, जि.प.सदस्या शांताताई कनुंजे,विश्वतेज देशमुख ,शिवराज जगताप, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग होनमाने, संपतराव देशमुख दुध संघाचे चेअरमन तानाजी जाधव व संचालक चंद्रकांत पाटील, सरपंच संभाजी यादव हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी संग्राम देशमुख यांनी कडेगाव तालूक्यातील अपशिंगे, नेर्ली, कोतवडे, खंबाळे औंध ,शिरसगांव, सोनसळ, सोनकिरे, पाडळी,आसद, चिंचणी, अंबक, मोहिते वडगांव, देवराष्ट्रे, शिरगांव, कुभारगांव, रामापूर, वांगी, शेळकबाव, हिंगणगांव (खुर्द), तडसर या गावतील य.मो.कृष्णा कारखान्याचे सभासदांना भेट देऊन जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या उमेदवारांच्या सोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास ही मागे पडणार नाही तसेच कोरोना काळाचा विचार करुन सभासदांनी स्वत: संकटाचे संरक्षण करुन घाटमाथ्यावरून सर्वात जास्त मतदान करुन आम्ही सहकार पॅनेलला बहुमतांनी विजयी करून देणार असल्याचा संदेश संग्राम देशमुख यांनी दिला.

यावेळी बाबासो शिंदे म्हणाले की, जयंवतराव आप्पांना १९९० साली घाटमाथ्यावरुन ८४मताने अघाडी मिळाली तेव्हापासून भोसले कुटूंबाचा विश्वास आपल्यावरती दृढ झाला आहे .आपले मावळे तत्पर्य आहेत . घाटमाथ्यावरील सभासद येथून पुढे एक ही अपात्र राहणार नाही, साखरेपासून एक ही सभासद वंचित राहणार नाही. सभासदांना योग्य न्याय देण्यासाठी व काम करण्याची संधी तसेच पृथ्वीराज बाबांचा व संग्राम भाऊंचा विश्वास सार्थ ठरवून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला प्रचंड बहुमताने विजय करा,असे आवाहन उमेदवार बाबासो शिंदे यांनी मतदारांना केले.

यावेळी कडेगाव तालुक्यातील कृष्णा कारखान्याचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments