Daily Mahasatta

Daily Mahasatta

ए. एम. परीक्षेत कलाशिक्षक अरविंद कोळी प्रथम

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ-  कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ए. एम. (आर्ट मास्टर) या उच्च कला पदविका परीक्षेत कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, पेठ मधील कलाशिक्षक अरविंद अधिकराव कोळी यांनी महाविद्यालयात प्रथम श्रेणीसह प्रथम क्रमांक मिळविला.
    
सदर परीक्षा त्यांनी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयातून दिली. अरविंद कोळी यांनी ए.एम.परीक्षेत  ९०० पैकी ५७७ गुणांसह प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच अरविंद कोळी यांना नुकतेच जायंटस् ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली  यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या विशिष्ट कौशल्यपूर्ण फलकरेखाटन कलेलाही महाराष्ट्रातून दाद मिळत आहे. ए.एम.परीक्षेतील यशाबद्दल राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदिप पाटील, कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर. डी. सावंत, डॉ.राजेंद्र कुरळपकर, अधीक्षक ए.डी. पाटील, पर्यवेक्षक एस. एल. माने, एस. एम. पवार, मुख्याध्यापक जे.पी. पाटील यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments