Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई

पेठ (रियाज मुल्ला) : वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता पेठ ता. वाळवा येथील ग्रामपंचायत व आपत्ती समिती ने गृह विलगीकरण चा निर्णय घेऊन येथीलच मराठी शाळेत कोरोना रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे.तसेच विनाकारण फिरणाऱ्यांचे अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे.
    

. जि. परिषद सदस्य सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व  डी.वाय.एस.पी  कृष्णात पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थित या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती जगन्नाथ माळी,तंटामुक्ती चे अध्यक्ष धनपाल माळी,उपसरपंच चंद्रकांत पवार, ग्रामविकास अधिकारी एम.डी. चव्हाण,गावकामगार तलाठी मुलाणी, पेठ आरोग्य केंद्राच्या अधिकारी सौ अर्चना कोडग, आपत्ती व्यवस्थापण समिती अध्यक्ष शंकर पाटील,अमीर ढगे, गोरख मदने, अशोक माळी, सहा. पो.नि. अनिल जाधव,पेठ बिटचे हवलदार श्रीकांत अभंगे,हवलदार दीपक भोसले,विकास दाभोळे,बजरंग भोसले, आदी मान्यवर  ग्रामस्थ उपस्थित होते.
    वाळवा तालुक्यात दैनंदिन 200 च्या वर रुग्ण सापडत आहे.यात पेठ ची रुग्ण संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे. आज ही गावात 60 च्या वर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.मध्यनतरी कोरोना रुग्णांना घरी राहून औषध उपचार करण्याची मुभा दिली मात्र रुग्ण ते रुग्ण त्याच्या बरोबर घरातील व्यक्ती सुद्धा बाहेर फिरून कोरोना चा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू लागल्याने इथून पुढे जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील त्यांना  येथील मराठी शाळेत विलीगिकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून  अत्यावश्यक सेवा सोडून दुपारी 4 पर्यंत दुकाने चालू ठेवण्यात येणार आहेत. तसेच मास्क न वापरणाऱ्या ना दंडात्मक कारवाही करण्यात येणार आहे. तसेच विनाकारण फिरणार्याना अचानक पणे अँटीजण टेस्ट ला सामोरे जावे लागणार आहे.
  विलीगिकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांना दोन वेळचे जेवण ,नाष्टा, चहा पाण्याची सर्व  सोय  वेंकटेश्वरा शिक्षण समूहाच्या वतीने करणार असल्याचे सम्राट महाडिक यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments