Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगावात राज्य सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन

कडेगांव (सचिन मोहिते) : मराठा व ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण राज्यसरकारने लवकरात लवकर या समाजासाठी मिळवून द्यावे, आम्हांला आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.आमच्या मराठा व ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढेल असा इशारा सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिला.

ते शनिवार दिनांक२६ जून २०२१ रोजी कडेगाव बस स्थानक चौक येथे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या निषेधार्त भाजपा तर्फे राज्यसरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन प्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा प्रकाश गढळे ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजाराम गरुड, कडेगाव भाजपा अध्यक्ष धनजंय देशमुख,सभापती मंगलताई क्षीरसागर, जि.प.सदस्या शांताताई कनुंजे,कडेगाव महिला मोर्चा अध्यक्ष पपिताताई सुतार उपस्थित होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की,राज्यात सध्या आरक्षण बाबत मराठा व बहुजनांवर अन्याय सुरू आहे.या सरकारने फसव्या घोषणा केल्याने या समाजाला जास्त नुकसान झाले आहे.त्यांना वंचित ठेवण्याचे डाव या तीन पायी सरकारने केले आहे.यांना या लोकांचे देणे घेणे काही नाही केवळ दिवस काढायचे आहेत. सरकार केव्हा ही पडू शकते हे सर्व लोकांना कळते आहे.या सरकारला काय हेतू साध्य करायचं हेच कळेना ,हे उचललेले पाऊल चुकीचे आहे.म्हणूनच भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे की राज्य सरकारचे लक्ष वेधन्यासाठी हे चक्काजाम अंदोलन करण्यात आले आहे.जनतेला त्रास व्हावा हा हेतू नाही तरी सरकारने याचा बोध घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे देशमुख यांनी सांगितले.
 
 कडेगाव येथे नायब तहसिलदार राजेंद्र यादव यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी  राजाराम गरुड, प्रकाश गढळे, धनंजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
      
यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सांगलीचे उपाध्यक्ष आकाराम पाटील ,भाजपा कडेगाव तालूकाध्यक्ष धनंजय देशमुख,माजी कडेगाव पंचायत समिती सदस्य धनाजी पाटील, धनगर समाज कडेगाव तालूका सरचिटणीस अधिक पिंगळे,कृष्णत मोकळे , राजेंद्र मोहिते,राहुल वाघमोडे, भुजंग माळी,गणेश रास्कर, सर्जेराव रुपनर,सचिन सलगर,सचिन पाटील, एकनाथ पाटील, पंडित गोरड  तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments