Daily Mahasatta

Daily Mahasatta

रणसंग्रामचे 'आशा ' कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेस सज्ज

सांगली (प्रतिनिधी) : रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल संचलित 'आशा ' कोविंड केअर सेंटरचे लोकार्पण मंगळवार दिनांक १ जून रोजी सकाळी आशा वर्ल्ड स्कूल कुंडल विटा रोड साठेनगर येथे संपन्न झाले. हे कोव्हीड केअर सेंटर 
रुग्णांना आत्मविश्वासासह घरचा आधार देणारे योग्य समुपदेशन करणारे केंद्र ठरावे, असे मत तहसीलदार-निवास ढाणे यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी गट विकास अधिकारी सौ स्मिता पाटील, पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉ रागिनी पाटील ,
कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण भोरे, ग्राम विकास अधिकारी श्री विकास कुलकर्णी, आशा वर्ल्ड स्कूल चे संस्थापक सारंग माने
रणसंग्राम सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अँड दीपक लाड,आशा कोविड केअर सेंटरचे मुख्य व्यवस्थापक श्री अविनाश मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

या कोव्हीड केअर सेंटर च्या माध्यमातून रुग्णांना आत्मविश्वास व मानसिक आधार देण्याचे मोठे कार्य होणार असून रुग्णांना हवेशीर वातावरण ,अत्यंत सुसज्ज हॉलसह सर्व सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती रणसंग्राम सोशल फौंडेशन चे अध्यक्ष अॅड दिपक लाड, सारंग माने सर व व्यवस्थापक अविनाश मोहिते यांनी दिली आहे. 

यावेळी उपस्थित सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचे रणसंग्राम सोशल फाउंडेशन च्या वतीने तहसीलदार व रोग्य अधिकार्‍यांच्या कडून मिठाई देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले 

जेष्ठ नागरिक पोपटराव सूर्यवंशी,राजेंद्र लाड, माजी पोलीस पवार दादा, विशाल पवार, संग्राम थोरबोले, जमादार सर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
विशाल कोंढाळकर, अनिकेत मोहिते, हनिफ शेख, सुरज महाराज सोळवंडे, संतोष चोथे, शंकर सोळवंडे , कृष्णा सोळवंडे, इमरान जमादार , वर्षा कोळी , कुमार जावीर , शाहिद मुल्ला , वैभव हुंडावळे, ओंकार भोसले, पवन चव्हाण, महादेव लाड, बाबू खंबाळकर संजय माळी यांच्यासह सर्वच सदस्य परिश्रम घेत आहेत..

Post a Comment

1 Comments