Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करावे: खासदार संजयकाका पाटील यांची मागणी

सांगली (प्रतिनिधी)

खासदार संजयकाका पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. संजय धोत्रे साहेब यांची भेट घेवून सांगली जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करावे अशी मागणी केली. या मागणीस मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करणेसाठी लवकरच याबाबतचा अहवाल मागवण्यात येणार आहे, अशी माहिती खा. पाटील यांनी दिली आहे.

खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय असणे आवश्यक आहे. पुणे व सोलापूर येथे केंद्रीय विद्यालये अस्तित्वात असून सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत मात्र एकही केंद्रीय विद्यालय कार्यरत नाही. त्यामुळे केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांना पुणे किंवा सोलापूर येथे जावे लागते. याकरिता  सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही केंद्रीय विद्यालयात शिकता यावे यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री मा. ना. संजय धोत्रे साहेब यांचेकडे जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करणेबाबत मागणी केली.

Post a Comment

0 Comments