Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

ताकारी ग्रामपंचायतीत शिवस्वराज्य दिन साजरा

वाळवा (रहिम पठाण) : ताकारी ग्रामपंचायतीच्यावतीने आज शिवस्वराज्य दिन व शिवस्वराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे शासन हे जनसामान्य जनतेला न्याय, हक्क व अधिकार देण्यासाठी निर्माण झाले होते. तोच आदर्श घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाचे काम चालले पाहीजे ज्या माध्यमातून छत्रपतींना अपेक्षित समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते, असे मत पंचायत समिती सदस्या सौ. रुपाली सपाटे यांनी व्यक्त केले. 

यावेळी सरपंच अर्जुन पाटील उपसरपंच रविंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments