Daily Mahasatta

Daily Mahasatta

नगरसेवक पद्मसिंह पाटील यांचा राजीनामा

विट्यात सत्ताधारी पाटील गटाला हादरा

विटा (प्रतिनिधी) : विटा नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक पद्मसिंह सुभाष पाटील यांनी आज सत्ताधारी गटातील युवा नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला. सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या पुतण्यानेच  नाराजी व्यक्त करत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नगरसेवक पद्मसिंह पाटील हे लोकनेते हणमंतराव पाटील यांचे यांचे नातू तसेच माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुतणे आहेत.  सन २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत पालिकेत नगरसेवक म्हणून एन्ट्री मारली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते सत्ताधारी गटातील युवा नेत्यांविरोधात नाराज होते. त्यांनी आपली नाराजी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत सत्ताधारी गटावर टीका केली. तसेच आज आपण राजीनामा देणार असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले होते.

आज दुपारी नगरसेवक पदमसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. सत्ताधारी गटातील प्रमुख युवा नेत्यांने नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा दिल्यामुळे विटा शहरासह तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे  नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पदमसिंह पाटील काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments