Daily Mahasatta

Daily Mahasatta

नोकरी लावण्यासाठी चुलता-चुलतीनेच केली लाखो रुपयांची फसवणूक

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी लावण्यासाठी साडे सात तोळे सोने व रोख साडे नऊ लाख रुपये घेवून फसवणूक करणाऱ्या सख्खा चुलता, चुलतीसह अन्य एका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हणमंत कृष्णा भोई, विजयमाला हणमंत भोई दोघेही रा.बोरगाव,व धनाजी अण्णा शिंदे रा.क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, इस्लामपूर, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद रुपाली तुषार काटकर (रा. एस्सार पेट्रोलपंपाजवळ इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिसांत दिली आहे.
      
वर्दीत म्हटले आहे की, चुलते हणमंत भोई हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करीत होते. त्यांनी व त्यांची पत्नी विजयमाला यांनी मार्च २०१४ साली रपाली यांचा भाऊ अवधुत याला जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी लावतो, असे सांगून बँकेची जाहीरात निघणार आहे. या परिक्षेत पास करण्याची व्यवस्था करतो. त्यासाठी ७ लाख रुपये लागतील, असे सांगितले. नोकरीच्या आशेने ते तयार झाले. पैसे नसतील तर हणमंत भोई यांनी सोने असल्यास द्या, असा मार्ग सुचवला. त्यामुळे साडे सात तोळे सोने त्यांच्या घरी जावून दिले. यानंतर भोई यांच्याकडे काटकर यांनी भावाच्या नोकरीबाबत चौकशी केली. पण जाहीरात निघाली की, नोकरी लावतो असे ते सांगत होते. त्यानंतर २०१९ मध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरतीसाठीची जाहीरात निघाली. अवधुत याने या पदासाठी अर्ज भरुन परिक्षा दिली. त्यानंतर हणमंत भोई यांच्याकडे नोकरीसाठी पाठपुरावा सुरु होता. दरम्यान त्यांनी १७ ते १८ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे रुपाली यांनी पती तुषार शिवाजी काटकर यांचे नावे पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. तसेच कुटुंबातील सर्वाकडील, अन्य नातेवाईकांकडून उसनवार करुन साडे चार लाख रुपये, असे एकूण साडे नऊ लाख रुपये भोई यांना घरी जावून दिले.त्यानंतर अवधुत याच्या नोकरीसाठी हणमंत व विजयमाला यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. पण ते टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी दिलेले सोने व पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी हणमंत भोई यांनी धनाजी शिंदे यांना मध्यस्थी घालून त्यांच्यामार्फत त्यांच्या खात्याच्या आयसीआयसीआय बँकेचा ११ लाख रुपयांचा चेक दिला. हा चेक बँकेत भरुन ही
तीन वेळा वटला नाही. पैशाची मागणी केल्यानंतर संशयीत आरोपी दमदाटी व शिवीगाळ करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments