Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिलीप पारलेकर यांची छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

पलुस (अमर मुल्ला) : दिव्य क्रांती सोशल फौंडेशन रत्नागिरी यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील योगदाना बद्दल छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कारासाठी क्रांती सह साखर कारखान्याचे शेती अधिकारी दिलीप पारलेकर यांची निवड करण्यात आली आहे. 
 
 दिलीप पारलेकर यांनी क्रांती कारखान्याच्या ऊस विकास अधिकारी व शेती अधिकारी या पदावरती काम करीत असताना ऊस विकासाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. तसेच कृषी क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचावण्यासाठी विवीध प्रयोग राबविले आहेत. या माध्यातुन क्रांती सह साखर कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या या कृषी क्षेत्रातील कार्या बद्दल दिव्यक्रांती सोशल फौंडेशन च्या वतीने रविवारी गोवा येथे छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार देवुन सन्मान करण्यात येणार आहे. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कामाचे मुल्यांकन दिव्य क्रांतीने केलेले आहे. यामुळे क्रांतीच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तूरा रोवला गेला आहे .
   
गेल्या दोन दशकापासुन सातत्याने कृषी क्षेत्रासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची भुमिका पार पाडली आहे हा पुरस्कार माझ्यासाठी पाठीवरती शाब्बासकीची थाप आहे. माझ्या या  कार्यात मला अरुण आण्णा लाड यांचे मार्ग दर्शन लाभले माझ्या सर्व हितचिंतकांचे व दिव्य क्रांतीचे मनापासून आभार मानतो असे पारलेकर म्हणाले, त्यांच्या या निवडीबद्दल आमदार अरुण लाड, शरद भाऊ लाड, किरण तात्या लाड तसेच कारखाना पदाधिकारी व  कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments