Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज बुधवारी ९०१ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर दिवसभरात चोवीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून दररोज सुमारे एक हजार च्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत तर मृत्यूचा आकडा देखील चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.

राज्यभरात कोरोना चा कहर कमी झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे सांगली जिल्ह्याचा सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे एक हजार च्या आसपास नवीन रुग्ण आढळून येत आहेत तर सुमारे 30 जणांचा दररोज उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन चे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता रुग्ण वाढीचा धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात ९०१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  तर यामध्ये आटपाडी ३०, जत ६०, कडेगांव ५४, खानापूर ६०, मिरज ८७, कवठेमहांकाळ ३१,  पलूस ७८, शिराळा ६१, तासगाव ५२, वाळवा २४४ तसेच सांगली शहर १०९ आणि मिरज शहर ३५ असे एकूण ९०१ नवीन रुग्ण जिल्ह्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments