Daily Mahasatta

Daily Mahasatta

१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे

सांगली (प्रतिनिधी) : केरळ राज्यातील १०० किलोच्या सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, तालुक्यात छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयए ची टीम शुक्रवारी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. 

 सोने तस्करीतील मुख्य सूत्रधार मुहम्मद मन्सूर याला नऊ जून रोजी अटक केली आहे. त्यांने दिलेल्या माहितीनुसार तस्करीचे सोने केरळमधून सांगली जिल्ह्यात पाठवण्यात आले होते. या तस्करी प्रकरणात केरळमधील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच तत्कालीन काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे प्रकरण एनआयए कडे सोपवण्यात आले आहे. जुलै 2020 मध्ये केरळमधून सांगली हे सोने आणण्यात आले.

या तस्करी प्रकरणी शुक्रवार पासून सांगली जिल्ह्यात छापे टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत १५ जणांना याप्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील कोट्यवधींच्या सोने तस्करी प्रकरणी आठजणांना तसेच कर्नाटकातील १० किलो सोने तस्करी प्रकरणी दोघाना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा १०० किलो घ्या सोने तस्करी प्रकरणाने सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments